चंद्रपूर : मौजा कोलारी, बेलगाव ,देऊळगाव, धानोरी, दिघोरी ,नांदगाव जानी ,भालेश्वर ,पिंपळगाव भोसले ,अऱ्हेर नवरगाव ,चिखलगाव ,लाडज ,हरदोली ,सावलगाव ,सोनेगाव, बेटाळा, बोळेगाव, खरकाळा ,रणमोचन ,पिंपळगाव खळखळा, रुई ,निलेश, पाचगाव ,गांगलवाडी, बरडकिणी ,चितेगाव, वांदरा ,डोरली ,आवळगाव ,हळदा, मुलगा मांगली ,किन्ही ,या गावातील जनतेला सूचित करण्यात येते की गोसीखुर्द प्रकल्पाचे सर्व दरवाजे खुले असून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे.
नक्की वाचा:
गोसीखुर्द धरणातून मोठा पाण्याचा विसर्ग; नदीने ओलांडली धोका पातळी - गोसिखुर्द प्रशासन
मध्य प्रदेश व नागपूर जिल्ह्यामध्ये भरपूर पाऊस झाल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्याने गोसीखुर्द धरणा मधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे तरी नदी काठावरील या सर्व गावातील जनतेला सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे. तरी सर्वांनी ही माहिती गावकऱ्यांना द्यावी ही विनंती आदेशाने मान्य पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी तसेच पोलीस पाटील बंधू-भगिनींना सूचित करण्यात येते की त्यांनी ही माहिती गावातील सर्व ग्रुप वर व सर्व जनतेला द्यावी ही विनंती.
सूचना : सध्या गोसीखुर्द चे 33 दरवाजे उघडले असल्याची माहिती आली. आवशक्यता पडल्यास विसर्गात पुन्हा वाढ होईल - अशी शक्यता दर्शविण्यात्त येत आहे. असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
प्रशासनाचे अलर्ट: आपल्या जिल्ह्यातील वैनगंगा नदी पत्रात गोसीखुर्द धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. तरी नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्क आणि सुरक्षित राहावे. संपर्क १०७७
गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ होईल. नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये- जा करणाऱ्या नागरिकंनी काळजी घ्यावी, सतर्क रहावे, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.