वडसा - तालुक्यात दुपारी 2 वाजताच्या सुमारास विजेच्या कडकळासह झालेल्या पावसात पाटलीन तलाव परीसरात शेळ्या चरत असताना अचानक वीज कोसळल्याने 8 शेळया जागीच ठार झाल्याची घटना बुधवार 20 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास देसाईगंज तालुक्यातील चोप येथील पाटलीन तलाव परीसरात घडली. यामुळे नानाजी व दादाजी केळझरकर या सख्या भावांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार चोप येथील पाटलीन तलाव परीसरात शेळया नेहमीप्रमाणे चरण्यासाठी गेल्या होत्या. अचानक मुसळधार पावसास सुरवात झाली. यावेळी शेळयांनी शेजारच्या झाडाचा आसरा घेण्याचा प्रयत्न केला.
| शेतात विद्युत तारेचा शॉक लागून शेतकरी पती-पत्नी जागीच ठार तर एक महिला जखमी|
असता अचानक त्यांच्या अंगावर विज कोसळल्याने आठ शेळया ठार झाल्या. विनोद नानाजी केळझरकर, बाबुराव सहारे, पिंटू फुलबांधे, आसाराम चौधरी हे 200 मीटर अंतरावर असल्याने कुठलीही जीवितहानी झाली
घटनेची माहिती कळताच चोप येथील तलाठी रोहिणी कांबळे व कोतवाल पर्वते घटनास्थळ गाठून पंचनामा केला.