सिंदेवाही : सिंदेवाही पोलीस स्टेशन अंर्तगत येत असलेल्या नविन विरव्हा या गावाजवळील राज्य महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार २५ सप्टेंबर २३ ला रात्री घडली.
माहितीनुसार, सरडपार चक येथील दादाजी शिवराम सावसाकडे (६५) उदालक केशव हजारे (५०) हे रस्त्यावर चालताना मागुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात दोघाचा जागीच मृत्यू झाला.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ मदतीस घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर पोलिस विभागाने वाहनाने ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे दाखल केले. सदर डॉक्टरांनी तपासणी केली असता दोघांनाही मृत घोषित केले. मागील दोन- तीन महिन्यांत महामार्ग वर अपघात चे प्रमाण वाढले असून अवैध गौण खनिज वाहतूक करणारे वाहने भरधाव वेगाने जात असल्याने अपघातातचे प्रमाण वाढले आहे. अशाच अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाने अनेक बळी घेतले आहेत.
सदर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने नाहक दोन बळी गेल्याने अशा अज्ञात वाहनावर कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अज्ञात वाहनाचा शोध घेणे सुरू आहे. सिंदेवाही पोलीस स्टेशन चे तुषार चव्हाण पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनात, सागर महल्ले उप निरीक्षक, पोलीस रणधीर मदारे पुढील तपास करीत आहे.