सिंदेवाही - सिंदेवाही तालुक्यात दुपारी 2 ते 3 वाजताच्या सुमारास विजेच्या कडकळासह झालेल्या पावसात शेत शिवारात धान पिकाची कामे करण्याकरिता गेलेल्या महीलावर वीज कोसळल्याने एक महिला ठार तर एक महीला गंभीर जखमी झाल्याची दुदैवी घटना घडली. शेतकरी व मजूर वर्ग धास्तावलेला आहेत. मृतक महीलेचे नाव महानंदा मोतीराम (वय 64 वर्ष) असे आहे तर जखमी महीलेचे नाव रोशना प्रफुल्ल गेदाम (वय 35 वर्ष) असे आहे . जखमी महीलेले सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता हलविले आहे .
सिंदेवाही तालुक्यातील सिरकड़ा शेतशिवारात दुपारी 2 ते 3 वाजताच्या सुमारास विज पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली असून सदर महीला सिरकाडा - प्रदीप यादव बोरकर यांच्या शेतावर धान पिकाची कामासाठी महीला गेल्या होत्या . दुपारच्या सुमारास अचानक पणे विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाल्याने वातावरणातील बदलामुळे घराकडे जाण्याच्या तयारीत व आश्रय शोधत असतांना दोन महीलावर विज कोसळल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर एक महीला गंभीर जखमी झाली . दुःखद घटनेमुळे कुटुंबावर दुःखा चा डोंगर कोसळला आहे . परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे गावात शोककळा पसरली आहे.
Note: News is updating by be dept.