नागपूर, २३ सप्टेंबर २०२३: नागपुरात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत दोन जण ठार झाले असून १४ जनावरे दगावली आहेत. नागपुरात काल ढगफुटी झाली. यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले. रस्त्यांवर वाहने तरंगू लागली. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तिचा मृतदेह एका वाहनातून बाहेर काढण्यात आला. या अतिवृष्टीमुळे बस, रेल्वेसेवा देखील प्रभावित झाली. प्रवाशांना मोठी तारांबळ उडाली. काही बसेसमध्ये जीव मुठीत घेऊन प्रवाशांनी चार तास काढले.
विडियो बघा:
नागपूरात झालेल्या मुसळधार पावसामुळं, शहरातील अनेक भागांमध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीची आणि झालेल्या नुकसानीची, आज केंद्रीय मंत्री @OfficeOfNG यांनी, @ngpnmc आयुक्त #डॉ_अभिजित_चौधरी, @Nitngp चे सभापती #मनोजकुमार_सुर्यवंशी, लोक प्रतिनिधींसह, अंबाझरी ओव्हर फ्लोपॉईंट इथ, पाहणी केली
नागपुरातील मेयो, मेडिकलच्या रुग्णालयात पाणी साचल्याने कामकाजावर परिणाम झाला. रुग्ण आणि कर्मचारी भिजले. २४ तासात नागपुर जिल्ह्यात १५० टक्के पाऊस झाला आहे. ही जिल्ह्याची मासिक सरासरी आहे. १९६२ नंतर सप्टेंबरमध्ये नागपुरात इतका पाऊस झाला नव्हता. नागपुर महापालिकेने बचाव कार्य सुरू केले आहे. बचाव पथकाने ३४९ लोकांना सुखरूप बाहेर काढले आहे.
- नागपुरात अतिवृष्टीचा आढावा
२ ठार, १४ जनावरे दगावली
रस्त्यांवर वाहने तरंगली
बस, रेल्वेसेवा प्रभावित
मेयो, मेडिकलचे रुग्ण भिजले
२४ तासात १५० टक्के पाऊस
१९६२ नंतर सप्टेंबरमध्ये इतका पाऊस
नागपूरमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने 10 हजार ते 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. पूरग्रस्तांनी आपल्या नुकसानीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदवून घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
फडणवीस यांनी शनिवारी नागपूर येथे झालेल्या पुरस्थितीनंतर ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पूरग्रस्तांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्य सरकार 10 हजार ते 50 हजार रुपयांची मदत देणार आहे. फडणवीस म्हणाले की, पूरग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, आर्मी आणि पोलिसांची मदत घेण्यात आली आहे. पूरग्रस्तांना खाद्यपदार्थ, पाणी आणि इतर आवश्यक वस्तूंची व्यवस्था करण्यात आली आहे. पूरग्रस्तांना तात्पुरत्या निवाऱ्यात ठेवण्यात आले आहे. फडणवीस यांनी पूरग्रस्तांना धीर देत सांगितले की, सरकार त्यांच्यासोबत आहे. पूरग्रस्तांना लवकरच त्यांच्या घरी परत जाण्यासाठी मदत केली जाईल.
राज्य सरकार त्यांना काही मदत उपलब्ध करून देणार आहे. दुकानांची ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे त्या ठिकाणी पन्नास हजार रुपयापर्यंत आपण त्यांना मदत करतो आहोत”. कुठे जर दुकाने लहान आहेत आणि त्यांचे नुकसान झाले आहे तर त्यांना देखील दहा हजार रुपयापर्यंत मदत करणार आहोत” असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले. जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते बांधण्यासाठी लगेच प्लॅन तयार करण्यास सांगितले आहे. “काही ठिकाणी लक्षात आले की जुन्या पुलांचा जो स्पॅन आहे त्या स्पॅनमध्ये एक पिलर असल्याने पाण्याचा प्रवाह आऊटलांक होतो आणि पाणी इकडे तिकडे फिरते. यामुळे काही ठिकाणी फुलं नव्याने बांधण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.
हजारीपहाड (सह्याद्री)भागात जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आणि मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली. या भागात गोठ्यात बांधलेली बारा जनावरे मृत झाली आहेत. प्रशासनातर्फे तत्काळ आर्थिक मदतीची घोषणा जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी केली आहे. तसेच, ही मदत तत्काळ देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
नजिकच्या हजारी पहाड नाल्यातील पाणी गोठ्यात शिरल्याने ही दुर्दैवी घटना घडली. गोठ्याचे व जनावरांचे मालक योगेश वऱ्हाडकर, राजेश वऱ्हाडकर आणि मृणाल भोगल यांचे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी सांत्वन केले. तसेच, प्रशासनाला या घटनेचा पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.
नागपूर जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील पावनगाव येथील कन्हान नदीला आलेल्या पुरामुळे ११ नागरिक अडकले होते त्यांना आपदा मित्र यांनी बोटी द्वारे सुखरूप बाहेर काढले.
मनपा मुख्यालयातील ‘श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर’ (सीओसी) ला आज आमदार चंद्रशेखर बावनकुळे, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बीपी, माजी महापौर तथा उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदिप जोशी यांनी भेट दिली तथा शहरात सर्वत्र लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील परिस्थितीची पाहणी केली.
मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. पाणी साचलेल्या भागात कार्यवाही करण्यासाठी डॉ. चौधरी यांनी प्रशासनाला निर्देश दिले.
नागपूरमध्ये आज पहाटे दोन ते पाच या तीन तासांत मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. (nagpur rain news today)अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे. एसटी स्टँडमध्येही पाच ते सात फूट पाणी शिरलं आहे. पुलाखालीही प्रचंड पाणी भरल्याने कार पाण्यात बुडाल्या आहेत. अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे. नागपुरातील पंचशील चौक ते झाशी राणी चौकात नाग नदीवरील पूल कोसळल्याची घटनादेखील या मुसळधार पावसाने घडली आहे. नागपुरातील नाग नदीला पूर आल्याने तसेच नाग नदीवरील पूल कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
नागपूर शहर परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देश त्यांनी दिले. धोकादायक घरे आणि नदीकाठच्या वस्तीतील रहिवाशांना सुरक्षितस्थळी तात्काळ हलविण्याच्या सूचना दिल्या. तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे, त्याठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. पाण्याची पातळी वाढल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफच्या अतिरिक्त तुकड्यांची मदत घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
#नागपूर शहर – परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आढावा घेतला. उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 23, 2023
नागपूरमध्ये काल चार तासांत 100 मिलिमीटर पेक्षाही जास्त पाऊस झाला. यामुळे धंतोली, अंबाझरी तलाव, सिताबर्डी मार्केट, मोर भवन बस स्थानक या महत्त्वाच्या भागांमध्ये पाणी भरले. नागरिकांच्या कमरेच्यावरही पाणी भरलेले आहे. या पुरामुळे अनेक ठिकाणी नागरिक अडकून पडले आहेत. दुकानांचा आणि घरांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. या सर्व बचावकार्यासाठी आता लष्कराच्या दोन तुकड्यांना पाचारण करण्यात आले आहे. पोलीस तुकड्या अंबाझरी परिसरामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि पुरात अडकलेल्या नागरिकांचा रेस्क्यू युद्ध पातळीवर सुरू आहे. आतापर्यंत 140 जणांना सुरक्षित स्थळी नेण्यात यश आले आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या बाहेर विभागाची बोट देखील रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मदत करत आहे. अंबाजरी परिसरातील काही घरांमध्ये अजूनही नागरिक अडकलेले आहेत. लष्कराच्या जवानांनी अशा घरांमध्ये जाऊन नागरिकांना रेस्क्यू केले आहे. नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, एका व्यक्तीचा पुरात मृत्यू झाला आहे.
एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चमूंनी आतापर्यंत 140 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. – मुक-बधीर विद्यालयातील 40 विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. – नागपूर शहराच्या विविध भागात 2 एनडीआरएफ चमू बचाव कार्यात आहेत. अग्निशमन दल सुद्धा मदत कार्यात आहे.
सकाळी शहरातील खोलगट भागातच नव्हे तर रस्त्यांवर व अनेक ठिकाणी पाणी जमा झाल्याने तलावाचे, नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. नाग नदीच्या काठावर असलेल्या अनेक वस्त्यात पाणी भरल्याचे व नागरिकांना पाण्यातून बचावासाठी बराच संघर्ष करावा लागल्याचे वृत्त हाती आले आहे. सीताबर्डी परिसरात पाणी शिरल्याने नदीचं स्वरुप आलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. कार, बाईक्स पाण्यात बुडाल्या आहेत. दुसरीकडे मोरभवन येथील एसटी स्टँडला तर नदीचं स्वरुप आलं आहे. एसटी स्टँडमध्ये पाच ते सहा फूट पाणी साचलं आहे. या पाण्यात सात ते आठ बस अडकल्या असून बसवर अडकलेल्या वाहक आणि चालकांना बाहेर काढण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. सीताबर्डी परिसरात पाणी शिरल्याने नदीचं स्वरुप आलं आहे.
अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. कार, बाईक्स पाण्यात बुडाल्या आहेत. दुसरीकडे मोरभवन येथील एसटी स्टँडला तर नदीचं स्वरुप आलं आहे. एसटी स्टँडमध्ये पाच ते सहा फूट पाणी साचलं आहे. या पाण्यात सात ते आठ बस अडकल्या असून बसवर अडकलेल्या वाहक आणि चालकांना बाहेर काढण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. जीव हजारी, सेपू अपार्टमेंट, अतकरी, माणके पाटील, रमेश विलोनकर, पांडुरंग आणि हाडकर, नवनाथ बागवाले आणि सत्यसाई सोसायटितील अनेक घरांत पुराचं पाणी शिरलं आहे. हजारी यांच्या घराची वाँल कम्पाऊंड जमिनदोस्त झाली आहे. अतकरी, रमेश विलोनकर यांच्या गोड्या पाण्याच्या विहीरी पुराच्या पाण्यानं तुडुंब होऊन ओव्हर फ्लो, परीसरातील सर्वांची दुचाकी आणि चारचाकी वाहनं तीन फुट पुराच्या पाण्यात डुबली. शनिवारला सकाळी चार ते साडे पाचपर्यंत विजांच्या भयावह गडगडाटीसह रेकाँर्ड ब्रेक मुसळधार पाऊस झाला आहे.
नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या 2 चमू बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत. या मुसळधार पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना गरज नसेल तर घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.
मुसळधार पावसामुळे नुकसान
मुसळधार पावसामुळे नागपूर शहरातील अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. अनेक घरांचे छप्पर उडाले आहेत. रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
शाळा महाविद्यालयांना सुटी
काल रात्री दोन वाजता पासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे आज शनिवार दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजी नागपूर महानगर व जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना जिल्हा प्रशासनाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नागपूर शहरातील शाळा व महाविद्यालय आज बंद असतील. पाऊस सतत सुरू असल्यामुळे नागरिकांनी गरज नसेल तर कृपया घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागाने नागपूर शहरात आज आणि उद्या देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. नागपूर महामनगरपालिकेचे अग्निशमन व आपत्कालीन सेवा पथक सातत्याने मदत व बचावकार्य करीत आहेत. कुठल्याही आपत्कालीन सेवेसाठी लगेच मनपाला 07122567029 किंवा 07122567777 या क्रमांकावर संपर्क साधा. अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा पथक रात्रीपासून मदत व बचाव कार्यात असून पथकाला सहकार्य करा.