चंद्रपुर (मुल): मुल तहसील मधील ताडाळा येथील वाघाच्या हल्यात (Tiger Attack) शेतकरी ठार झाल्याची घटना 22 सेप्टेंबर रोज शुक्रवारला ला सकाळच्या अंदाजे सात च्या दरम्यान घडली आहे. सूर्यभान टिकले (५५) रा. चिचाळा असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
सविस्तर वृत्तांत असे आहे की, मुल तहसील येथील 58 वर्षीय शेतकऱ्याला वाघाने ठार केले. सात वाजताच्या सुमारास सूर्यभान हा आपल्या शेतात पाहणी करण्याकरिता गेला असता आधीच शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने झडप घातली आणि त्या झडपेत काही कळण्याआधीच शेतकरी हे गतप्राण झाले.