चंद्रपूर: शहरातील गोल बाजार परिसरातील टिळक मैदानात सकाळच्या सुमारास एका वृद्धाचा गळा चिरून खून केल्याची संतापजनक घटना घडली आहे. शहरातील विठ्ठल मंदिर परिसरातील मधुकर मंधेवार (७०) असे मृतकाचे नाव आहे.
गोलबाजार परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या मधुकर मंधेवार यांचा आज दिनांक ३ सप्टेंबरच्या पहाटे गळा चिरुन हत्या झाल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती शहर पोलीस ठाण्यात दिली.
या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस सोबतच अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीशसिंग राजपूत यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेची माहिती घेतली.
मृताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चंद्रपूर सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास चंद्रपूर शहर पोलीस करत आहेत.