ब्रम्हपुरी: चंद्रपूर येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धेत ने हि कन्या विद्यालय ब्रम्हपुरीच्या हँडबॉल संघाने 14 वर्षीय गटात पोड्डार इंटरनॅशनल स्कूल, चंद्रपूर या संघाचा 8-1 पराभव करीत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच 17 वर्षीय गटात श्री महर्षी विद्या मंदिर, चंद्रपूर या संघाचा 13-1 ने पराभव करीत प्रथम क्रमांक पटकावला. सदर स्पर्धेमध्ये दोन्ही संघाने विभागीय स्तरावर चंद्रपूर जिल्हयाचे नेतृत्व करण्याचा मान मिळविला.
Bramhapuri | Bramhapuri Live | Bramhapuri News | Bramhapuri Today | ब्रम्हपुरी
ने. हि. कन्या विद्यालयने आजपर्यंत अनेक खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर पाठवून गौरव प्राप्त केला आहे. ने. हि. संस्थेचे श्री. अशोकजी भैय्या, मुख्याध्यापिका सौ. बनपुरकर, उपमुख्याध्यापक श्री. भैय्या सर, पर्यवेक्षक श्री. निखारे सर यांच्या प्रो्साहनामुळे तसेच क्रीडा प्रशिक्षक कु. एन. पी. भरती मॅडम, श्री. बारेकर सर तसेच प्रशिक्षक सूरज मेश्राम, शुभम जनगले यांच्या विशेष सहकार्यामुळेच हे धवल यश प्राप्त करता आले. यापुढील वाटचाली करीता सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
Bramhapuri: N.H Kanya Vidyalaya Triumphs in District Sports Competitions
At the District Sports Complex in Chandrapur, district sports competitions were recently held. N. H. Kanya Vidyalaya Bramhapuri's handball team clinched the top position in the 14-year age group, defeating Poddar International School, Chandrapur, with a score of 8-1. Additionally, in the 17-year-old category, they secured the first position by defeating Shri Maharshi Vidya Mandir, Chandrapur, with a commanding score of 13-1. Both teams have earned the distinction of representing Chandrapur district at the regional level.
N. H. Kanya Vidyalaya has a proud history of nurturing athletes who have excelled at the state and national levels, thanks to the unwavering support of Mr. Ashokji Bhaiya, Headmistress Mrs. Banpurkar, Vice Principal Shri. Bhaiyya Sir, Supervisor Shri. Nikhare Sir, and sports coach Ms. N. P. Recruitment Madam, along with the dedicated efforts of coaches Suraj Meshram and Shubham Jangale. Congratulations on this remarkable achievement, and best wishes for the future.