भंडारा, दि.11 : मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी जिल्हास्तरीय मराठी भाषा समितीने विविध उपक्रमाचे आयोजन करावे तसेच शासकीय कामकाजात मराठीचा वापर वाढवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी समितीच्या बैठकीत दिले.
या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यासह अशासकीय सदस्य स्मिता गालफाडे व सुमंत देशपांडे उपस्थीत होते.या समितीत जिल्हा माहिती अधिकारी व ग्रंथालय अधिका-यांचा समावेश करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
जिल्हयातील सर्व शासकीय आस्थापना व दुकानातील पाटया मराठीत कराव्यात. जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन कर्मचा-यांनी करावे,तसेच शासकीय कार्यक्रमात मराठी पुस्तकांची भेट मान्यवरांना दिली. ग्रंथप्रदर्शन व ग्रंथदिंडीव्दारे शिक्षणाधिका-यांनी विदयार्थ्याना वाचनासाठी प्रोत्साहन देण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.