हायलाइट्स:
- प्रवाह तेज असल्याने युवकाचा मृतदेह दुसरीकडे गेल
- तब्बल दोन दिवसानंतर देव्हाडा नरसिंहटोला नदीकाठालगत मृतदेह सापडला
तुमसर: तालुक्यातील मांडवी गावाजवळील वैनगंगा नदी पात्रात मासेमारी करिता गेलेल्या एका युवकाचा मासे पकडत असताना पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाल्याची घटना दि. २१ ऑगस्ट ला घडली होती. दरम्यान या घटनेची माहिती सिहोरा पोलिसांना मिळताच पोलीस विभाग व महसूल विभागाच्या पथकाने युवकाचा मृतदेह शोधण्याचे कार्य सुरू केले. मात्र पाण्याच्या प्रवाह तेज असल्याने युवकाचा मृतदेह अद्याप आढळला नाही.
तब्बल दोन दिवसानंतर म्हणजे दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास तुमसर तालुक्यातील देव्हाडा नरसिंहटोला नदीपात्रातील काठालगत युवकाचा मृतदेह मृतावस्थेत आढळला. नंदकिशोर उरकूडा मेश्राम (३३) रा. मांडवी ता. तुमसर असे मृतकाचे नाव आहे.
मृतकाचा मृतदेह तब्बल २५ ते ३० किलोमीटर अंतरावर पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला होता. दरम्यान घटनेची माहिती मिळताच येथील तलाठी गोविंद अंबुले, सरपंच सहादेव ढबाले, पो. हवा. एल. पी. राघोते, वैभव खाडे यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे दाखल केले. सदर घटनेचा पुढील तपास सिहोरा पोलीस करीत आहेत.