चंद्रपूर:- पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा गावातील तरुणाने चंद्रपूरात गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. मृतक युवकाचे नाव नरेश सुधाकर सिडाम (Naresh Sudhakar Siddam) (वय २७ वर्षे) राहणार चेक आष्टा अस आहे.
हे देखील वाचा:
पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा गावातील नरेश सुधाकर सिडाम हा चंद्रपूर येथील मेजर गेट परिसरात राहत होता. आज दि. ११ ऑगस्टला सकाळच्या सुमारास नरेशने गळफास घेत जीवनयात्रा संपवली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.