चंद्रपूर(दि.26 ऑगस्ट) :- भद्रावती तालुक्यात येत असलेल्या टेकाडी शेत शिवारात वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार झाल्याची घटना उघडकीस आली .लक्ष्मीबाई रामराव कन्नाके वय 60 वर्ष रा. रा. टेकाडी(दी.) ता. भद्रावती जिल्हा चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
मृतक महीला सकाळी आपल्या शेतात निंदन करायला गेली पण अचानक महिलेवर दबा धरून असलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला व तीला ठार केले. या घटनेची माहिती कळताच वनविभागाचे पथक व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी टेकाडीचे पोलिस पाटील सुभाष झाडे, वनरक्षक जनबंधू, गणेश गायकवाड आणि इतर गावकरी उपस्थित झाले होते.