फोटो बातमी दर्शवीत आहे. |
चंद्रपुर: सावली तालुक्यातील पाथरी (Pathari) - पालेबारसा (Palebarsa ) या मार्गावर आज सायंकाळी चार वाजताच्या सुमारास दोन दुचाकी मध्ये जोरदार धडक झाल्याने या अपघातमध्ये एक जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झालेले आहे.
हे देखील वाचा:
सावली तालुक्यातील विहीरगाव (Vihirgav) येथील रहिवासी अजय कोटांगले व पद्माकर नन्नावरे हे कामानिमित्त पाथरीला जात असतानाच पाथरी जवळील कन्नडगाव येथील राकेश गुरुदास मिळावी आणि अनुराग वसंत गेडाम हे आपल्या गावाकडे परत येत असतानाच आमने -सामने यांच्या दुचाकी मध्ये जोरदार धडक झाल्याने या धडकेत अजय कोटांगले राहणार विहीरगाव हे जागीच ठार झाले असून यात पद्माकर ननावरे, राकेश मडावी, अनुराग गेडाम हे गंभीर जखमी असल्याची माहिती पुढे येत आहे.
हे देखील वाचा: