अमिर्झा नदीपरीसरात - पार्टी केल्यानंतर नदीच्या पात्रात आंघोळीकरीता उतरलेल्या महावितरण कंपनीच्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना चातगांव- खुर्सा नजीकच्या कठाणी नदीपात्रात जलसमाधी मिळाल्याची घटना आज २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली.
मृतकामध्ये एक काटलीचा ठाकरे तसेच खुर्सा- गिलगावयेथील लाईनमन चौधरी यांचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार आज काही कंत्राटी कर्मचारी पार्टी करण्यासाठी गेले होते. जेवणानंतर आंघोळीसाठी नदीच्या पात्रात उरतले असता दोघांचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Amirza River Tragedy: Two Mahavitaran Company Contract Workers Drown during Post-Party River Bath Tragic news unfolds as two contract employees of Mahavitaran Company lost their lives while bathing in the riverbed of Kathani, near Chatgaon-Khursa. The deceased have been identified as Thackeray from Katli and Lineman Chaudhary from Khursa-Gilgaon.
Reportedly, the unfortunate incident occurred after a group of contract workers attended a party. Subsequently, during a post-meal bath in the river, both individuals drowned. The case is currently under investigation under the supervision of Police Inspector Fegde.