गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये, विद्यापीठातील पदव्युत्तर शैक्षणिक विभाग व सर्व संबंधीतांना सुचित करण्यात येते की, विद्यापीठाचे पदव्युत्तर शैक्षणिक विभाग व संलग्नित महाविद्यालयात सुरू असलेल्या विविध अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याची अंतीम २२ ऑगस्ट २०२३ होती. (Gondwana University Extends Admission for Academic Session 2023-24 )
परंतू अनेक विद्यार्थी विहीत तारखेपर्यंत महाविद्यालयात प्रवेश घेवू शकले नाही व विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचीत राहू नये, यासाठी सर्व प्रवेश पात्र विद्यार्थाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांच्या परवानगीने ०६ सप्टेंबर २०२३ पर्यंत महाविद्यालयात प्रवेश घेण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे.
सदर मुदतवाढ ज्या अभ्यासक्रमाचे प्रवेश केंद्रीय प्रवेश समितीव्दारे केले जातात त्यांना लागू राहणार नाही. निर्धारीत प्रवेश क्षमतेमध्ये रिक्त जागी प्रवेश देण्यासाठी हि मुदतवाढ देण्यात येत आहे.