भंडारा दि. 4: जिल्हा परिषद भंडारा येथील विविध विभागांमधील गट-क संवर्गातील एकूण 320 रिक्त पदे सरळसेवेने (Bhandara Zilha Parishad Recruitment 2023) भरण्यात येत आहे. या मध्ये आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ट सहायक (लिपीक), कनिष्ठ सहायक (लेखा), पशुधन पर्यवेक्षक, लघुलेखक (निम्न श्रेणी), वरिष्ट सहायक (लिपीक), वरिष्ट सहायक (लेखा), विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (पंचायत), विस्तार अधिकारी (सांख्यीकी), स्थापत्य अभियांत्रीकी सहायक, अंगणवाडी पर्यवेक्षीका ही पदे असून या रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 5 ते 25 ऑगस्ट 2023 पर्यंत असणार आहे. (Bhandara Zilha Parishad Recruitment 2023)
हे देखील वाचा:
इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या लिंकवर दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजीच्या रात्री 23.59 वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा. रिक्त पदांचा तपशिल पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी जिल्हा परिषद भंडाराच्या www.bhandarazp.org या संकेतस्थळावर तसेच जिल्हा परिषद कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध आहे.
सदर पदभरती संदर्भात अडचणी किंवा समस्या उदभवल्यास हेल्प लाईन क्रमांक 01784-252262 व हेल्प लाईन E-mail ID :- [email protected] यावर संपर्क साधावा.