मुल: दिव्यांग करिता निधी गोळा करीत असलेल्या शाळकरी विद्यार्थिनीला निधी देण्याच्या बहाण्याने घरामध्ये बोलावून अत्याचार केल्याची खळबळ जनक घटना बेंबाळ पोलीस चौकी अंतर्गत जुनगाव येथे सोमवार रोजी घडली. पोलीसानी आरोपीला अटक केली आहे .
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षकांच्या सांगण्यावरून दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता निधी संकलन करण्याकरिता जुंनगाव मध्ये विद्यार्थिनी फिरत होती. मात्र जुनगाव येथील नितेश विनाजी नवघरे (वय 22 वर्ष ) रा. जुनगाव याने विद्यार्थिनीला सोमवार रोजी दुपारच्या सुमारास निधी संकलन करीत असताना घरामध्ये बोलावले आणि विद्यार्थिनीवर अत्याचार केला विद्यार्थिनीं घाबरून न जाता घडलेल्या सर्व प्रकार घरी जाऊन आपल्या आईला सांगितला.
हे देखील वाचा:
आईने तात्काळ पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली मूल पोलिसांनी लगेच आरोपी नराधमास पोस्को कायद्यान्वये ४,८ कलम बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम कलम ३(१) (11)(1 )(2)3 (2 )आधी गुन्हा अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. घटनेच्या पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.
नोट: बातमी एक्सप्रेस पब्लिकेशन हाऊस बलात्कार किव्हा अन्य अत्याचार बातमी लेखनात अल्पवयीन मुलगी किव्हा महिलेचा नाव प्रकाशित करीत नाहीत.