गोंदिया. श्रीनगर येथील स्थानिक रहिवासी असलेल्या निरज अशोककुमार मंकणी (वय २४) याला क्रिकेट सामन्यांमध्ये सट्टा लावण्याची खुप सवय होती. निरजने क्रिकेटमध्ये खूप पैसा गुंतवला होता.
मात्र त्यात त्याचा पराभव झाला. त्यामुळे निरज मंकणी यांनी राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.