गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनाकडुन आवाहन करण्यात आले आहे. की, शासन आपल्या दारी या कार्यक्रमाकरीता ०८ जुलै २०२३ वार शनिवार रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गडचिरोली दौरा नियोजित आहे. ( Gadchiroli Road Closure )
त्याकरिता ०८ जुलै रोजी होणाऱ्या दौऱ्याच्या अनुषंगाने अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या वाहतुकीसाठी कोटगल टी-पॉईंट ते कोर्ट टी-पॉईंट, एम.आय.डी.सी. मार्ग, शासकीय विश्रामगृह मार्ग चंद्रपुर रोड, जिल्हाधिकारी कार्यालय मार्ग आणि कॉम्प्लेक्स रोड हे मार्ग ०८ जुलै वेळ सकाळी ०६.०० वा. ते सायंकाळी ०६.०० वा. पर्यंत सर्वसामान्य नागरिकांच्या रहदारीसाठी बंद राहणार आहे. याची सर्व नागरिकांनी दखल घ्यावी व कोणीही या मार्गाचा वापर न करता पर्यायी मार्गाचा वापर करावा
‘हे’ मार्ग राहणार बंद:
- एम. आय. डी. सी. मार्ग
- कोटगल टी-पॉईंट ते कोर्ट टी-पॉईंट
- शासकीय विश्रामगृह मार्ग चंद्रपुर रोड
- जिल्हाधिकारी कार्यालय मार्ग आणि कॉम्प्लेक्स रोड हे मार्ग सर्वसामान्य नागरिकांच्या रहदारीसाठी बंद राहणार आहे.