चंद्रपूर: मुल जवळ ट्रॅव्हल्सचा अपघात। Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Mul,Chandrapur Accident,Accident,Accident News,Chandrapur Today,Chandrapur Accident News,Mul Accident,

Chandrapur News,Chandrapur,Mul,Chandrapur Accident,Accident,Accident News,Chandrapur Today,Chandrapur Accident News,Mul Accident,

चंद्रपूर:- 
भरधाव वेगात असलेल्या ट्रॅव्हल्सचा मध्यरात्री गडचिरोली-चंद्रपुर महामार्गावरील मुल जवळ अपघात झाला. या अपघातात ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला पलटल्याने 40-45 प्रवाशी जखमी झाल्याची खळबळजनक घटना 15 जुलै च्या मध्यरात्री घडली.

छत्तीसगड येथून प्रवाशी घेऊन हैदराबाद जाणारी ट्रॅव्हल्स क्रमांक AR 01 U 5655 चंद्रपूर गडचिरोली महामार्गावरील मूल एमआयडीसी जवळ पलटी झाली. यात 40-45 प्रवासी प्रवास करत होते तर प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती होताच मूल पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तात्काळ जखमी प्रवाश्यांना उपचारासाठी मूल रुग्णालयात हलवण्यात आले. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.