नागभीड:- चंद्रपूर जल्ह्यातील नागभीड तालुक्यातील तळोधी बा. पोलीस स्टेशन हद्दीतील एका अल्पवयीन मुलीसोबत 26 वर्षीय युवकाने प्रेमाचे चाळे करून तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केले. गजानन कैलास भाकरे (वय 26) असे आरोपीचे नाव आहे.
अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून तळोधी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी गजानन कैलास भाकरे (वय 26) यांच्या विरोधात अपराध क्र. 37/2023 कलम 376 (2) (n) भांदवी सह कलम 6 पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.
तळोधी बा. पोलीस स्टेशन चे ठाणेदार मंगेश भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. आय. भास्कर पिसे पुढील तपास करीत आहे.