गोसीखुर्द च्या पाणलोट क्षेत्रात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस होत असल्याने गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 31 गेट अर्धा मीटरने उघडण्यात आले असून 3,557 क्युमेक्स (1,25,615) क्युसेक्स पाण्याचा विसर्ग टप्याटप्याने वैनगंगा नदी पात्रात सुरु आहे. दुपारी 3 वाजताच्या सुमारास धरणातून विसर्गात पुन्हा वाढ करण्यात आलं आहे. सध्या गोसीखुर्द चे 31 दरवाजे उघडले असल्याची माहिती पण लवकरच पुन्हा काही उर्वरीत गेट खुले करण्यात येतील. 31 दरवाज्यातून 3,557 क्युमेक्स (1,25,615 ) क्युसेक्स पर्यंत पाणी विसर्ग वैनगंगा नदी पात्रात करण्यात येत आहे. विसर्गात पुन्हा वाढ होईल आणि उर्वरीत गेट खुले होतील- अशी शक्यता दर्शविण्यात्त येत आहे.
गोसीखुर्दच्या पाणलोट क्षेत्रात काल रात्रीपासून मुसळधार पावसाने भंडाऱ्याची जीवनदाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीचे पात्र आता दुथडी भरून वाहू लागले आहे.
गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ होईल. तरी भंडारा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहेत. नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये जा करणाऱ्या नागरिकंनी काळजी घ्यावी, सतर्क रहावे, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.
1. वैनगंगा नदी :
गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 31 गेट 0.50 मी. ने उघडलेले असुन 3,557 क्युमेक्स (1,25,615 क्युसेक्स) विसर्ग आहे.
प्रकल्पाच्या पाणलोट झालेल्या अतिवृष्टीमुळे गोसीखुर्द धरणातून 4,000 क्युमेक्स (1,41,260 क्युसेक्स) पर्यंत विसर्ग टप्प्या-टप्प्याने वाढविण्यात येणार आहे. तरी वैनगंगा नदी काठावरील गावातील नागरिकांनी उचित सतर्कता बाळगावी, तसेच नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी आवश्यक काळजी घ्यावी.
चिचडोह बॅरेज चे 38 पैकी 38 गेट उघडलेले असुन विसर्ग 5,049 क्युमेक्स (1,78,305 क्युसेक्स) आहे.
वडसा, वाघोली व आष्टी या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वैनगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.
2. वर्धा नदी :
निम्न वर्धा प्रकल्पाचे 31 पैकी 31 गेट बंद असुन विसर्ग निरंक आहे.
बामणी (बल्हारशा) व सिरपूर/सकमूर या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वर्धा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.
3. प्राणहिता नदी :
महागांव सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार प्राणहिता नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.
4. गोदावरी नदी :
- श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पाचे 62 पैकी 62 गेट बंद असुन विसर्ग निरंक आहे.
- लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे 85 पैकी 22 गेट उघडलेले असुन विसर्ग 1620 क्युमेक्स (57,210 क्युसेक्स) आहे.
- सद्य:स्थितीत बॅरेज ची पाणी पातळी 98.00 मी. असुन पूर्ण संचय पातळीच्या 2.00 मी. ने खाली आहे.
वैनगंगा-प्राणहिता व वर्धा या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे बॅरेज मध्ये पाण्याचा येवा वाढत असल्याने बॅरेजचे पुन्हा 13 गेट उघडण्यात येणार असुन विसर्ग 2,265 क्युमेक्स (80,000 क्युसेक्स) पर्यंत वाढविण्यात येणार आहे, तरी गोदावरी नदी काठावरील गावातील नागरिकांनी उचित सतर्कता बाळगावी, तसेच नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी आवश्यक काळजी घ्यावी.
# कालेश्वरम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार गोदावरी नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.
5. इंद्रावती नदी :
जगदलपूर, चिंदनार व पाथागुडम या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इंद्रावती नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.
र्लकोटा नदीची पाणी पातळी भामरागड सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इशारा पातळीच्या खाली आहे.
---
बंद असलेले मार्ग
- लाहेरी ते कुवाकोडी पर्यंत राष्ट्रीय महामार्ग (बिनागुंडा नाला) (ता. भामरागड)
- चांदाळा ते कूंभी मार्ग (ता.गडचिरोली)
- रानमूल ते माडेमूल मार्ग बंद (ता.गडचिरोली)
---
हवामान संदेश :
🟠भारतीय हवामान विभागाचे नागपूर, हैद्राबाद, रायपूर व भोपाल केंद्र यांचे दिनांक 16.07.2023 रोजीच्या पर्जन्यमान इशारा संदेशानुसार पुढील 24 तासात वैनगंगा-प्राणहिता, वर्धा, इंद्रावती व मध्य गोदावरी उपखोऱ्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याचे संकेत दिलेले आहे. कृपया उचित दक्षता घ्यावी.