भद्रावती:- इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दि. १० जुलै रोजी सोमवारी मध्यरात्री सुमारास भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथे घडली. ( Class 10th Student Committed Suicide )
मृतकाचे नाव साहिल सुनील ठक (वय १६) रा. घोडपेठ असं आहे. चांदा आयुध निर्माणी वसाहतीतील केंद्रीय विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता. मृतक साहिल हा मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथील रहिवाशी होता. तो घोडपेठ येथील आपल्या आजोळी राहून शिक्षण घेत होता. साहिल याने घटनेच्या मध्यरात्री विष प्राशन केले व स्लॅब वर गेला. तेथेच त्याचा मृत्यू झाला.
सदर घटना मंगळवारी सकाळी उजेडात आली. तो स्लॅबवर मृतावस्थेत आढळून आला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. आपल्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नसल्याचे त्याने आपल्या सुसाईड नोटमधे लिहले असल्याचे पोलिसांनी सांगितले. भद्रावती पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. पण साहिलने आत्महत्या का केली अद्यापही कारण समजलं नाही आहे.