चंद्रपूर: कोठारी येथील वॉर्ड न १ येथील १६ वर्षीय विद्यार्थिनीची गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवरला उघडकीस आली. गळफास घेवून आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आसावरी अनिल चौधरी (१६) अस आहे.
आसावरी हि इयत्ता दहावीत शिकत होती. शाळेतील हुशार मुलगी होती.वडील दुपारी घरी आल्यानंतर त्यास आसावरी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. सदर प्रकारची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देण्यात आली.घटनेची नोंद घेऊन पुढील तपास ठाणेदार विकास गायकवाड यांचे मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत. मात्र तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.