चंद्रपूर : जिल्ह्यात आज दोन - तीन वाजताच्या सुमारास वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. ब्रम्हपुरी,नागभीड,सिंदेवाही,पोंभूर्णा, कोरपना व गोंडपिंपरी तालुक्यात वीज पडून ८ जणांचा जागीच मृत्यू झाला तर नऊ जण गंभीर जखमी झाले.
मृतांमध्ये गीता पुरुषोत्तम ढोंगे (४५), गोविंदा लिंगू टेकाम (५६), अर्चना मोहण मडावी (२७), पुरुषोत्तम अशोक परचाके (२५), कल्पना प्रकाश झोडे (४०), अंजना रूपचंद पुस्तोडे (५०), योगिता खोब्रागडे (३५) आणि रंजन बल्लावार यांचा समावेश आहे.
खालील लिंक वरून बातमी वाचा:
- ब्रम्हपुरी: शेतावर काम असताना अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू
- देलनवाडी शेतशिवारात वीज पडून दोन महिलांचा मृत्यू तर एक महिला जखमी.!
- शेतात वीज पडून महिलेचा जागीच मृत्यू; सहा शेतमजूर जखमी
ब्रम्हपुरी जवळील मौजा बेटाळा येथील गीता पुरुषोत्तम ढोंगे (45) ही शेतमजूर महिला शेतावर काम करून घरी परत येत असताना अंगावर वीज पडून मरण पावल्याची घटना आज 3 च्या दरम्यान घडली.