ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी वरून स्वगावाकडे परत जात असतांना मालडोंगरी ते चकबोथली रोडवर दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या जबर धडकेत एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास घडली असल्याची माहिती आहे.
मृतकाचे नाव रामचंद्र बक्षी मैंद (45) रा.चकबोथली कसरला तर जखमीचे नाव मोहन रामचंद्र सहारे (50) रा.काटली चक असे आहे. जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हे देखील वाचा:
प्राप्त माहितीनुसार मृतक चंद्रा व मोहन ब्रह्मपुरीला काही काम निमित्ताने आले होते आपले काम आटोपून स्वगावाकडे दुचाकीने परत जात असतांना दुचाकीला एका अज्ञात चारचाकी वाहनाने जबर धडक दिली ज्यात चंद्रा याचा जागीच मृत्यू झाला तर मोहन जखमी झाला. रस्त्याने ये-जा करणाऱ्या परिचित व्यक्तींनी जखमी इसमास रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व घटनेची माहिती ब्रह्मपुरी पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास कार्य करीत आहेत.