Bhaskar Pere Patil: आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील उद्या ब्रम्हपुरीत | Batmi Express

Bhaskar Pere Patil,Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Chandrapur Live,Bramhapuri Live,Bramhapuri News,

Bhaskar Pere Patil,Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Chandrapur Live,Bramhapuri Live,Bramhapuri News,

ब्रम्हपुरी
: ब्रम्हपुरी येत्या १५ जुलैला दिव्यदीप बहुउद्देशिय संस्था ब्रम्हपुरी या एनजीओ च्या वतीने पंचायत राज सशक्तीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून या कार्यक्रमाला औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा येथील आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. ब्रम्हपुरी शहरात त्यांचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. गाव कसा सुधारायचा, गावाचा सर्वांगीण विकास कसा साधायचा, गावातच रोजगार निर्माण करण्यासाठी कसे प्रयत्न केले पाहिजेत हे विकासपुरुष आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्या वाणीतून ऐकावयास मिळणार आहे. वर्षभरात वेगवेगळ्या विषयाला स्पर्श करीत दिव्यदीप बहुउद्देशीय संस्था ब्रह्मपुरी ने बरीच सामाजिक कार्य केलेली आहेत.

संस्थेला एक वर्ष पूर्ण झाल्याने संस्था आपल्या प्रवासाचा पहिला वर्षपूर्ती सोहळा पंचायत राज सशक्तीकरण कार्यक्रम घेऊन साजरा करणार आहे. १५ जुलै रोज शनिवारी होत असलेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा आ. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारा (ग्रा. प्र) जि.प. चंद्रपूरचे कपिल कलोडे तथा पंचायत समिती ब्रम्हपुरीचे गटविकास अधिकारी संजय पुरी हे राहणार आहेत. दिव्यदीप बहु. संस्थेच्या अध्यक्ष डॉ. स्निग्धा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.