वडसा (देसाईगंज) ३० जुलै : तालुक्यातील सावंगी येथील शांतीनगर जवळील नदी पात्रात चिखलाने माखलेल्या अवस्थेत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. गोसीखुर्द मधून दि: २८-७-२०२३ ला पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदी पात्रता करण्यात आलं होत.
हे देखील वाचा:
मृतदेह गोसीखुर्द पाण्याचा प्रवाहामधून वाहत आला असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलं आहे.
नदी पात्रात मृतदेह असल्याची माहिती आज सकाळच्या सुमारास गावातील नागरिकांना कळताच बघण्याकरीता मोठी गर्दी केली. याबाबत माहिती तात्काळ देसाईगंज पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतकाचे शव उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालय वडसा येथे पाठविले. मृतकाची अद्याप ओळख पटली नसून पुढील तपास देसाईगंज पोलीस करीत आहेत.