गडचिरोली – तालुक्यातील बामणी येथील रहिवासी असलेले प्रकाश देवीदास कुरुडकर (वय ४५) यांनी गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली आहे. पण आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. प्रकाश कुरूडकर हे शनिवारला रात्री जेवण करून आपल्या घरी झोपले होते.
मात्र मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास त्यांच्या पत्नीने बघितले असता घरी प्रकाश दिसले नाही. त्यामुळे त्यांच्या पत्नीने आणि घरच्यानी इतरत्र शोधाशोध सुरू केली असता काहीच इतरत्र थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे त्यांनी ३ जुलै रोजी गडचिरोली येथे जावून पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. शोध तपासादरम्यान ४ जुलै रोजी अलोणी-जेप्रा रस्त्यावरील नदी घाटावर एका गळफास घेतलेल्या इसमाची माहिती मिळाली. अधिक चौकशी अंती ते प्रकाश असल्याचे दिसून आले. त्यांनी नेमक्या कोणत्या कारणाने आत्महत्या केली, याबाबत पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.