सिंदेवाही : अंतरगाव येथे एका ३६ वर्षीय युवकाने झाड़ाला फास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवार म्हणजे दिनांक - १७ जून २०२३ ला सायंकाळी ४:३० वाजताच्या सुमारास घडली.
माहितीनुसार सिंदेवाही तालुक्यातील अंतरगाव येथील प्रमोद नंदू शेन्द्रे (३६) या युवकाने गावाला लागून असलेल्या शेतशिवारात एका झाडाला फास लावून आत्महत्या केली. सदर बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच घटनेची माहिती सिंदेवाही पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला व मृतकाला शव विच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक तुषार चौव्हान यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक सागर महल्ले करीत आहे.