HighLights:
- गडचिरोली जिल्हयात चार दिवस दिवस अवकाळी पाऊसाचा थैमान
- ८ जून रोजी कोरडे हवामान राहणार
गडचिरोली, दि.10 : हवामान विभागाने वर्तविलेल्या आंदाजांनूसार पुढिल 4 दिवस संपूर्ण गडचिरोली जिल्हयांमध्ये अवकाळी पाऊसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील चार दिवस काही ठिकाणी हलक्या सरीचा पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना आणि वादळ-वारा येणार असल्याची संभावना प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर विभागाने वर्तविली आहे.
हवामान खात्याने वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार ७ जून,९ जून,१० जून ते ११ जून २०२३ रोजी गडचिरोली जीह्यात येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.८ जून रोजी कोरडे हवामान राहणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे.त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी; असे आवाहन करण्यात आले आहे.