सिंदेवाही - सिंदेवाही तालुक्यातील नवेगाव लोनखैरी येथील एका 36 वर्षीय इसमास वाघाने ठार केल्याची घटना घडली आहे. मृतकाचे नाव- रघुनाथ नारायण गुरनुले असे आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात आज वाघाच्या हल्ल्यात 36 वर्षीय युवक ठार झाल्याने एकच खळबळ उडाली, एकीकडे मानव वन्यजीव संघर्ष कुठेतरी थांबावा यासाठी वनविभागात अनेक ग्रामीण भागात जनजागृती करीत आहे तर दुसरीकडे मानव-वन्यजीव संघर्ष वाढताना दिसत आहे.
आज दि. 15/06/2023 ला सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान रघुनाथ नारायण गुरनुले. रा. नवेगाव लोन त. सिंदेवाही जि. चदंपूर वय. 36 यांना नवेगाव चक जंगल परिसरात वाघाने ठार केले.
या घटनेची माहिती होताच तात्काळ वन विभागाचे अधिकारी हटवार साहेब व त्यांची टीम तसेच सिंदेवाही पोलीस स्टेशन पीएसआय महाले व त्यांचे पथक हे घटनास्थळी पोहोचले त्यांनतर सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह नेण्यात आला.