चंद्रपूर, दि. 29 : 29 जुन हा दिवस प्रा. प्रशातचंद्र महालनोबीस यांच्या जन्म दिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून 2007 पासून साजरा केला जातो. या निमित्ताने जिल्हा सांख्यिकी कार्यालय, चंद्रपूर येथे राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) सुनिल धोंगडे, सुभाष कुमरे (प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी), सांख्यिकी अधिकारी अमित सुतार, आदिवासी विकास प्रकल्पाचे नियोजन अधिकारी ए. एम. नंदनवार, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) जी. के. सातपुते सहायक व कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात शाश्वत विकास ध्येयाचे सनियंत्रण करण्यासाठी राष्ट्रीय निर्देशक आराखडयासह राज्य निर्देशक आराखडा यांची एकत्रीत सांगड या विषयावर सुनिल धोंगडे, यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित सर्व अधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन अजय भेंडे यांनी तर आभार श्री. वंजारी यांनी मानले.