लाडज गावासभोवताल चार दिवसापासून पुराचे पाणी - 2022 वर्षी |
ब्रम्हपुरी : तालुक्यातील लाडज या गावाला यावर्षी पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. लाडज हे गाव चारही बाजूने वैनगंगा नदीने वेढलेले आहे. मागील 5-6 दिवसांपासून गोसीखुर्द क्षेत्रात सतत रिमजीम आणि कुठं कुठं मुसळधार पाऊस पडत आहे. लाडज गावाला नेहमी बेटाचे स्वरूप प्राप्त होते. गावात आरोग्य सूविधा नाही. त्यामुळे येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसत आहे. ब्रम्हपूरी तालुक्यात वडसा-ब्रम्हपूरी मार्गावरील वैंनगंगा नदीकाठावर लाडज हे गाव आहे. याठिकाणी मागील दोन दिवसापासून पुरस्थिती निर्माण होण्याचं चित्र दिसत आहे. सध्या सर्व मार्ग सुरूच आहेत पण या गावातील नागरिकांना पुरातून प्रवास करावं लागत आहे. कारण पुराच्या पाण्यात वाढ होतं असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या पूर जास्त नसल्यामुळे जनता नदीपात्रातून वाहनांनी प्रवास करीत आहे. परंतु पाण्याची पातळीत वाढ होताना दिसत आहे. जर नदी पात्रातील पाण्यात जास्त वाढ झाली तर डोंगा प्रवास गावातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी लवकरच सुरु करण्यात येईल . :- डोंगा चालक
सन 2004-05 आणि 2015-2016 मध्ये पाण्यात बुडून अनेकांना आपलं जीव गमवावा लागला. सन 2020 मध्ये 1994 पेक्षाही मोठं महापूर आलं होत. संपूर्ण गावात पुराचे पाणी साचलेले होते. हेलीकॉप्टर च्या आणि बोट च्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे लागले होते.
त्यामुळे स्थानिक प्रशासन जास्त रिक्स घ्यायला तयार नाही शिवाय ज्यांच्याकडे डोंगे आहेत अशा व्यक्तींना जास्त प्रवाहात डोंगे टाकण्यास स्थानिक प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे. गावात आरोग्य सुविधेचा अभाव असून लहान मुले, गरोदर स्त्रिया, वृध्द नागरिक व इतर साठी एक आपतकालीन बोट उपलब्ध करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे.
लाडज गावाच्या सभोवताल पुराचे पाणी असल्यामुळे मार्ग बंद करण्यात येत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान दरवर्षी होत आहे. कारण जास्त पूर आलं कि मार्ग बंद केले जातात आणि त्यामळे विद्यार्थी शाळेत / महाविद्यालयात जाऊ शकत नाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. यासाठी तात्काळ एक बोट देण्याची मागणी बातमी एक्सप्रेसच्या माध्यमातून विद्यार्थानी प्रशासनाला केली आहे.
सन 2020 सालच्या महापुराची पुरावृत्ती होण्याचीही मोठी शक्यता यावर्षी सुद्धा करण्यात येत आहे. त्यामुळे तात्काळ प्रशासनाने याची दखल घेवून आवश्यक ती मदत करावी अशी मागणी अ गावकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे.
लाडज गावाचा पुरातून प्रवास कसा होतो?
- पहिला मार्ग - लाडज ते सावंगी (डोंगा प्रवास)
- दुसरा मार्ग - लाडज ते चिखलगाव (डोंगा प्रवास)
- तिसरा मार्ग - लाडज ते पिंपळगाव (डोंगा प्रवास)