कुरखेडा (गडचिरोली - सत्यवान रामटेके) :- कुरखेडा लुक्यातअवैधरीत्याशासनाच्या गौण खनिजांचीतस्करी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढतच चालली होती.तस्करी करणाऱ्यांवर पाहिजे त्या प्रमाणात कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने अवैध रेती,मुरूम,माती व इतर गौण खनिजांचे उत्खनन करून ‘माल सुतावो’ अशी भूमिका चोरट्यांकडून केली जात होती.अशातच कुरखेडा तहसील कार्यालयाचे नवनियुक्त तहसिलदार राजकुमार धनबाते यांनी अवैध तस्करी करणाऱ्यांविरोधात कारवाईचा सपाटा चालविण्यास सुरुवात केल्याने तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
कुरखेडा तालुक्यातील कुंभिटोला येथील काल शनिवारी रात्रीच्या सुमारास सती नदी पात्रात अवैध रेती भरले ट्रॅक्टर घाटातून निघत असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार व नियोजित भरारी पथक यांना मिळताच; सदर घटनास्थळ गाठून पथकाने पाठलाग करीत तहसील कार्यालयासमोर ट्रॅक्टर क्रमांक-एम. एच.३४ ए पी ३११२ वाहनास रेतिसह पकडले.
त्या नंतर लगेच सती नदी येथील रेती भरत असलेले दोन ट्रॅक्टर घटनास्थळी पकडले.सती नदीत ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. ३३ एफ ४८११ व एम.एच. ३३ वी ३२३७ असे दोन्ही ट्रॅक्टर भरारी पथकाच्या हाती लागले.पकडले ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करणे करिता नेत असतांना ट्रॅक्टर क्रमांक – एम.एच. ३३ वी ३२३७ घेवून पसार झाला.सदर घटनेमुळे सुरक्षेच्या दृष्टीने पकडलेले दोन्ही ट्रॅक्टर कुरखेडा पोलिस स्टेशनच्या आवारात जमा करण्यात आले आहेत.प्राप्त माहितीनुसार कुरखेडा येथील तुषार कुथे,तळेगाव येथील सचिन सहारे व मालदुगी येथील महेंद्र सहारे यांचे मालकीचे ट्रॅक्टर असल्याने त्यांच्या वरती महसूल विभागाचे गौण खनिज कायद्या अंतर्गत प्रकरण दाखल करण्यात आले आहे.