ब्रम्हपुरी (Bramhapuri) तालुक्यातील बेलगाव (belgoan) (कापरी) येथे नळ पाणीपुरवठा योजनेचा पाईप लाईन चे काम करणाऱ्या गरिब मजुराला अमानुष मारहाण करण्यात आली. फक्त या कारणास्तव कि माझ्या बाई कडे बघीतले का? जर बघीतले तर अशा प्रकारे अमानुष मारहाण केली जात असेल आणि पोलीस घटना स्थळी जाऊन सुध्दा तक्रार दाखल होत नसेल व त्या गरिब मजुराला दबाव निर्माण करून तक्रार न करण्याची धमकी दिली गेली का असा प्रश्न उपस्थित होते .
या व्हिडिओत अमानुष मारहाण (Inhuman beating) करतांना दिसत आहे आणि हात, पाय ट्रॅक्टरला बांधून व कोयता दाखऊन गावात व परिसरात दहशत माजविण्याचा प्रकार दिसत आहे.
बीड (Beed) जिल्ह्यातील कामगार पाणी पुरवठा विभागाच्या कामासाठी बेलगाव येथे असतांना महिलेला बघितले या कारणासाठी माजी ग्रामपंचायत सदस्य व त्यांचा सहकाऱ्यांनी कामगाराला ट्रॅक्टर ला बांधून कोयता दाखवून, अंगावर डिझेल, पेट्रोल टाकून जीवानिशी मारण्याची धमकी देत बेदम मारहाण करण्यात आली आहे. ब्रम्हपुरी पोलीस यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.