आजकाल सोसिअल मीडिया (Social Media) वर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये केंद्र सरकार / जिओ कडून सर्व मोबाईल वापरकर्त्यांना 28 दिवसांसाठी मोफत मोबाईल रिचार्ज देणार असल्याचा दावा केला आहे.
केंद्र सरकार 'मोफत मोबाईल रिचार्ज स्कीम' अंतर्गत 28 दिवसांसाठी सर्व वापरकर्त्यांना 239 रुपयांचे फ्री रिचार्ज देत आहे. मिळालेल्या मेसेजमध्ये वापरकर्त्यांना रिचार्ज मिळविण्यासाठी निळ्या लिंकवर क्लिक करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. अशा मोफत रिचार्जचा लाभ कधी पर्यंत घेऊ शकाल याची माहितीही मेसेजमध्ये देण्यात आली आहे.
सध्या सोशल मीडियावर हा मेसेज तीव्र गतीने व्हायरल झाल्यानंतर पीआयबी फॅक्ट चेकच्या ( PIB Fact Check ) पथकाने 'मोफत मोबाईल रिचार्ज स्कीम' ची चौकशी केली. ज्यामध्ये असे आढळून आले की व्हायरल होत असलेला मेसेज पूर्णपणे खोटा आहे. त्यामुळे अशा कोणत्याही मॅसेजवर विश्वास ठेऊ नका. आणि कुठल्याही लिंकवर क्लिक करू नये .