कोरची प्रतिनिधी - कोरची तालुका हा आदिवासी बहुल असून नक्षलग्रस्त आहे आणि महाराष्ट्रातील तालुका स्तरावरील ग्रामपंचायतींना सण 2015 पासून नगरपंचायतचा दर्जा देण्यात आला आहे. आणि तेव्हापासुन येथे सफाई कामगार आहेत त्यांना किमान वेतनश्रेणी लागू करावी अशी मागणी बुद्धिस्ट युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनात केली आहे.
स्थानिक नगरपंचायत कोरची येथे सफाई कामगार सकाळ पासून सायंकाळ पर्यंत म्हणजे 10 ते 12 तास काम करतात आणि त्यांना कंत्राटी पद्धतीने अत्यल्प मोबदला दिला जातो. शासनाच्या सुचने प्रमाणे कंत्राटदाराने कामगारांना प्रत्येक महिन्याला त्याच्या खात्यावर मानधन जमा करायला पाहिजे पण तसे न करता रोख रक्कम दिल्या जाते त्यामुळे मानधनाच्या रकमेत एकवाक्यता नाही. कोरोना काळात सुद्धा सफाई कामगारांनी जीव धोक्यात घालून निरंतर काम केले आणि त्यांना कोणत्याही प्रकारे कंत्राटदाराकडून विमाकवच नाही. कामगार काम करत असतांना साप, विंचू किंवा आकस्मित कारणाने मृत्यू झाल्यास कोणत्याही प्रकारचे आर्थिक लाभ सुद्धा मिळणार नाही. आणि कामगाराचा परिवार रस्त्यावर यायला वेळ सुद्धा लागणार नाही. ही बाब लक्षात येताच स्थानिक बुद्धिस्ट युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. मात्र तहसीलदारांचे काम बंद आंदोलन असल्याने अव्वल कारकून के. एन. कुमरे मॅडम यांना निवेदन सोपविण्यात आले आहे. निवेदन देण्याकरिता बुद्धिस्ट युवक संघटनेचे अध्यक्ष कमलेश भाऊ भानारकर, सल्लागार चेतन भाऊ कराडे , चंदू भाऊ वालदे , स्वप्निल भाऊ कराडे ,इशांत भाऊ अंबादे, आकाश साखरे, सिद्धार्थ जांभुळकर, मोहित भैसारे, अंकित नंदेश्वर, सामाजिक कार्यकर्ते यादव खोब्रागडे, व सफाई कामगार उत्तम बागडेरिया, लालदास मडावी, हरशिंग पोरेटी, हिरालाल जमकातन, लव बखर, कुश बखर, विनायक जेंगठे, गोकुल जमकातन, अरुण मोहूर्ले, सुकालू गंधेल, माहेश्वरी सोनार, रंजना मोहूर्ले, बासनबाई गंधेल हे उपस्थित होते.