- बाबासाहेबांच्या विचारांचे पाईक व्हा --- महेंद्र ब्राम्हणवाडे
गडचिरोली:- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त जिल्हा काँग्रेस कमिटी , गडचिरोली च्या वतीने अभिवादन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करा असा मार्ग दाखविला मात्र आमचा बहुजन समाज अद्यापही अंधश्रद्धा, जात - धर्म - पंत यातच अटकला असल्याने व चुकीच्या मार्गाने त्याचे अनुकरण केल्याने आपले संविधान संपविण्याचा काम सत्ताधाऱ्यांकडून होत आहे त्यामुळे आज आपल्याला खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचाराचे पाईक होणे काळाची गरज आहे. असे मत गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, प्रदेश सचिव महिला काँग्रेस भावना वानखेडे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, शंकरराव सालोटकर, नेताजी गावतुरे, प्रभाकर वासेकर, पांडुरंग घोटेकर, काशिनाथ भडके, राकेश रत्नावार, सुनील चडगुलवार, सुरेश भांडेकर, हरबाजी मोरे, समय्या पशुला, प्रफुल आंबोरकर, रमेश धकाते, नृपेश नांदनकर, जावेद खान, प्रतीक बारसिंगे, निखिल खोब्रागडे, महेश जिलेवार, निकेश कामीडवार, कल्पना नंदेशवर, पौर्णिमा भडके, सुनीता रायपुरे, वर्षा गुलदेवकर, सुवर्णा उराडे, दिलीप खोब्रागडे, राज डोंगरे, रुपेश सलामे सह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.