चंद्रपूर (Chandrapur) : प्रेयसीवर पेट्रोल टाकून प्रियकराने गळफास लावून आत्महत्या (Suicide by hanging) केल्याची घटना मूल येथे सोमवारी घडली. या घटनेने मूल मध्ये खळबळ उडाली आहे. गळफास लावून आत्महत्या करणा-या मृतकाचे नाव बंडू उर्फ रामचंद्र निमगडे वय 45 वर्ष रा. वार्ड क्रं.11 मूल असे आहे.
शेजारी राहणा-या एका विवाहीत असलेल्या मुलीशी मृतकाचे ब-याच वर्षापासून प्रेमसंबध होते. त्यामुळे मृतकाच्या घरी नवरा – बायको मध्ये नेहमी भांडणे व्हायची. दोघांनाही एक – एक मुलगा असून यांच्या प्रेमसंबधाचीं नेहमीच चर्चा व्हायची. सोमवारी दुपारी तणावामध्ये असतांना बंडू निमगडे यांने एका बॉटल मध्ये पेट्रोल (Petrol) आणून प्रेमसंबध असलेल्या प्रेयसीच्या घरी जावून तिच्या अंगावर पेटोल टाकले. तिला जिवानीशी मारण्याचा प्रयत्न केला. त्याच तणावामध्ये असताना बंडू निमगडे यांने आपल्या राहत्या घरी येवून गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना दुपारी दोन वाजताच्या दरम्यान ची आहे. पेटोल टाकून जखमी झालेल्या महिलेला मूल मध्ये प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे पुढील उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.
घटनास्थळी पोलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेसी यांनी भेट दिले. पुढील तपास मूल पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक बनसोड करीत आहेत.