बल्लारपूर (Ballarpur) : आज दुपारी राजुरा तालुक्यातील सिंधी येथे शेतात विज पडून ७ जण जखमी झाले आहेत.
सर्व जखमींना उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार आज दुपारी १ वाजता चे दरम्यान सिंधी येथील मधुकर धानोरकर यांचे शेतात, शेतमालक स्वतः, त्यांची पत्नी व इतर १५ मजुर काम करित असताना मेघगर्जने सह पावसाला सुरुवात झाली व अचानक पणे विज कोसळून ७ जण जखमी झाले. त्यात शेत मालक मधुकर धानोरकर, उषा सुरेश चौधरी, किरण पुरुषोत्तम चौधरी, माधुरी भाष्कर मोरे, मंदाबाई मधुकर धानोरकर, मृणाल शेषराव बोबडे, अर्चना सुनिल चौधरी असे जखमी झाले असून उपचारार्थ ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांवर उपचार सुरू आहेत.
सदर माहिती मिळताच जेष्ठ काँग्रेस नेते, माजी सभापती आबाजी पाटील ढुमणे, उपसरपंच रामभाऊ ढुमणे, भाष्कर मोरे, भैय्या मोरे, सुरेश ढुमणे, इर्शाद शेख, तलाठी शेंडे यांनी प्रत्यक्ष रुग्णाची मदत करीत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून दिलास दिला.