चिमूर: काजळसर येथे मोबाईलच्या टॉर्च द्वारे करण्यात आली प्रसूती | Batmi Express

Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Today,Nagpur,Chandrapur News,Chimur,Chimur Crime,Chandrapur Crime Live,Chandrapur Crime,

Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Today,Nagpur,Chandrapur   News,Chimur,Chimur Crime,Chandrapur Crime Live,Chandrapur Crime,

चंद्रपूर
: चिमूर तालुक्यातील काजळसर (Kajalsarया गावामधील अनेक दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र यातील विद्युत पुरवठा खंडीत असल्यामुळे तात्काळ प्रसूती च्या वेळेस जनतेला तसेच मातेला फार संघर्ष करीत प्रसूती करून घ्यावी लागते याबाबत आरोग्य प्रशासनास माहिती असूनही दुर्लक्ष करीत असल्यामुळे दिनांक. 03 मार्च 2023 ला रात्रीच्या अंधारात मोबाईल च्या टॉर्च मध्ये प्रसूती करण्यात आली परंतु काही कारणामुळे बाळाला व मातेला काजळसर वरून 21 किमी अंतर असलेल्या चिमूर  ( Chimur ) येथील उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले.

यामुळे स्थानिकांमध्ये रोष निर्माण झाला असून याबाबत ची माहिती संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरल्याने आरोग्य अधिकारी यांच्यावर ताशेरे ओढल्या जात आहे. वरिष्ठ अधिकारी संबंधित आरोग्य कर्मचारी व आशावर्कर यांचेवर कुठल्या प्रकारची कारवाई करेल याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.