- देहव्यापार अड्ड्यावर कारवाई करीत 2 पीडित मुलींची सुटका
- 2 पीडित मुलींन महिला सुधारगृहात पाठविण्यात आले
चंद्रपूर:- दिनांक १५/०३/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांना खबर मिळाली की, पोलीस स्टेशन भद्रावती हद्दीत एका ठिकाणी अवैधरित्या अनैतिक देहव्यापार सुरु असुन त्या ठिकाणी एक महीला स्वतःचे आर्थीक फायद्याकरीता मुली व महीलांकडुन देहव्यापार करवुन घेत आहे. अशा मिळालेल्या माहीतीच्या अनुषंगाने श्री बिपीन इंगळे, पोलीस निरीक्षक, पोस्टे भद्रावती आणि श्री मंगेश भोयर सहा. पोलीस निरीक्षक स्थागुशा चंद्रपूर यांचे पथकाने भद्रावती ते वरोरा जाणा-या रोड चे बाजुला असलेल्या शेतशिवारातील एका घरावर छापा कारवाई केली असता त्या ठिकाणी एक स्त्री तिचे आर्थीक फायद्याकरीता दोन महीलांकडुन देहव्यापार करवुन घेत असतांना मिळुन आली. त्या महीलेस सोबतच्या महीला पोलीस अंमलदारांचे मदतीने ताब्यात घेवुन अटक करण्यात आली असुन इच्छेविरुध्द देहव्यापार करवुन घेत असलेल्या दोन्ही पिडीत महीलांची सुटका करण्यात आल्याने मा. न्यायालयाने आदेशाने त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.