राज्यात परीक्षांमध्ये कॉफीच्या घटना समोर येत असल्याने दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय बोर्डाने यावर्षीपासून रद्द केला आहे. त्यामुळे पेपरच्या आधीचे दहा मिनिटे प्रश्नपत्रिकेसाठी दिली जात नसल्याने पेपरच्या नंतर दहा मिनिटे बोर्डाने वाढवून द्यावी अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी शिक्षण मंडळाकडे केली होती.
त्यानंतर ही मागणी मान्य करत बोर्डाच्या पेपरच्या निर्धारित वेळेच्या नंतर दहा मिनिटे विद्यार्थ्यांना वाढवून दिली जाणार आहेत. तसेच राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे माहिती देत राज्य मंडळातर्फे होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दरम्यान विद्यार्थी परीक्षेच्या टेन्शनने, भीतीने मानसिक तणावाखाली येतात.
अशा विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करून समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे यानुसार सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत निशुल्क समुपदेशन मिळणार आहे.
समुपदेशनासाठी मोबाइल क्रमांक
7387400970, 8308755241,
9834951752, 8421150528,
9404682716, 9373546299,
8999923229, 9321315928,
7387647902, 8767753069