HSC Paper Copy : कॉपी प्रकरणात आठ विद्यार्थी रस्टीकेट; गोंदिया 5, चंद्रपूर 2, वर्धा 1 | Batmi Express

Nagpur,HSC 2023,HSC 2023 Exam,HSC Exam Copy News,Chandrapur,Gondia,Wardha,Bhandara,Gadchiroli,HSC 2023 Exam News,

Nagpur,HSC 2023,HSC 2023 Exam,HSC Exam Copy News,Chandrapur,Gondia,Wardha,Bhandara,Gadchiroli,HSC 2023 Exam News,

नागपूर:- 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवारी घेण्यात आलेल्या बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये नागपूर विभागातील आठ विद्यार्थांनी कॉपी केल्याचे पुढे आले आहे. बारावीच्या शालांत परीक्षेतील पहिला पेपर इंग्रजीचा होता. नागपूर विभागातून १ लाख ५५ हजार ९१३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर, ४८४ केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. नागपूर विभागातील या केंद्रामध्ये राबविलेल्या मोहिमेत आठ विद्यार्थांवर मंगळवारी कारवाई करण्यात आली.

  • गोंदिया -5
  • चंद्रपूर - 2 
  • वर्धा -1 
  • नागपूर - 0
  • भंडारा - 0
  • गडचिरोली - 0

यामध्ये, गोंदिया मध्ये सर्वाधिक ५, चंद्रपूरमध्ये २ आणि वर्धामधील एका प्रकरणाचा समावेश आहे. तर, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली एकही कॉपीचे प्रकरण पुढे आले नाही. शिक्षण मंडळाने परीक्षेमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची संख्या वाढवली होती.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.