समता युवा समाजिक संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांचा सत्कार | Batmi Express™

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Armori Live,Armori,Gadchiroli Batmya,Armori News,

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Armori Live,Armori,Gadchiroli Batmya,Armori News,

आरमोरी :
 तालुक्यांतील शहरी व ग्रामीण भागातही कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून सामाजिक जाणिवेने काम करणारे आरमोरी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांचा समतायुवा सामाजिक संघटनेच्या वतीने शुक्रवारी शाल, श्रीफळ व पुष्गुच्छ देउन सत्कार करण्यात आला.

आरमोरी पोलीस ठाण्याला पोलिस निरीक्षक म्हणून रुजू झाल्या पासून अल्पावधीतच पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यानी आपल्या कार्याची अमिप छाप उमटविली आहे सामजिक बांधिलकी जोपासून ते नेहमीच काम करीत असतात. त्यामूळे ठाणेदार मनोज काळबांडे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून समता युवा सामजिक युवा संघटनेच्या पदाधिाऱ्यांनी भेट घेऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी समता युवा सामजिक संघटनेचे मार्गदर्शक प्रा. अमरदीप मेश्राम, महेंद्र रामटेके, ॲड. अमीत टेंभुर्ण अध्यक्ष निलेश अंबादे, उपाध्यक्ष प्रविण रहाटे, सचिव अनुप रामटेके, सहसचिव मंगेश पाटील सह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.