दहावी-बारावी तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर | Batmi Express

SSC 2023,HSC 2023 Exam,HSC 2023,HSC 2023 Exam News,CBSE Exam,HSC Exam,Education,SSC 2023 Exam,SSC 2023 Exam News,

 SSC 2023,HSC 2023 Exam,HSC 2023,HSC 2023 Exam News,CBSE Exam,HSC Exam,Education,SSC 2023 Exam,SSC 2023 Exam News,

मुंबई : फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी आणि तोंडी परीक्षा 1 ते 20 फेब्रुवारी, तर दहावीच्या या परीक्षा 10 फेब्रुवारी ते 1 मार्च यादरम्यान होणार आहेत.


शाळेतील विद्यार्थी संख्या लक्षात घेता वेळापत्रकानुसार प्रात्यक्षिक परीक्षा घेणे शक्य झाले नाही तर विद्यार्थी संख्या आणि प्रयोगशाळा क्षमतेनुसार विभागीय मंडळ स्तरावर प्रात्यक्षिक परीक्षेचा कालावधी ठरवून परीक्षा घेण्यात याव्यात, अशा सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिल्या आहेत.
मंडळाने दिलेल्या कालावधीत परीक्षा घेता न आल्यास प्रात्यक्षिक, तोंडी विषयांच्या परीक्षा तसेच अंतर्गत मूल्यमापन आऊट ऑफ टर्न परीक्षा पद्धतीने घेण्यात येणार आहेत. बारावीची आऊट ऑफ टर्न परीक्षा 23 ते 25 मार्च आणि दहावीची 27 ते 29 मार्च या कालावधीत पार पडणार आहेत. तसेच दहावीतील दिव्यांग विद्यार्थ्यांची कार्यशिक्षण विषयाची लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा 27 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत होणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.