स्वतःला वाचवण्यासाठी तरुणीने नवजात मुलीला बाथरुमच्या खिडकीतून फेकले | Batmi Express

New Mumbai,Crime,crime news,Crime in New Mumbai,crime mumbai,latest mumbai news,Mumbai,Mumbai Live,Mumbai News,mumbai news today,

New Mumbai,Crime,crime news,Crime in New Mumbai,crime mumbai,latest mumbai news,Mumbai,Mumbai Live,Mumbai News,mumbai news today,

नवी मुंबई :
 अनैतिक संबंधातून गरोदर राहिलेल्या अविवाहित तरुणीने जन्म दिलेल्या नवजात मुलीची केली हत्या आहे. नवी मुंबईत ही धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणीने बाळाला बाथरुमच्या खिडकीतून फेकून दिले आहे. पोलिसांनी या तरुणील ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी नवी मुंबईच्या एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनआरआय पोलिसांनी सदर तरुणीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन तिला ताब्यात घेतले आहे. तिचे वय १९ वर्षे आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी तरुणीचे तिच्या मामाच्या मुलासोबत प्रेमसंबध होते. यावेळी मामाच्या मुलासोबत केलेल्या शारीरिक संबंधातून ८ महिन्याची गरोदर राहिली. या दोघांचे लग्न झाले नव्हते.
या अविवाहित तरुणीने घरातील बाथरुममध्ये मुलीला जन्म दिला. यानंतर तिने नवजात मुलीला बाथरुमच्या खिडकीतुन बाहेर फेकून दिले. यात या बाळाचा मृत्यू झाला आहे. उलवे परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. स्थानिकांना परिसरात हे मृत बाळ आढळून आले. यानंतर एनआरआय पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर चौकशी दरम्यान सदर तरुणी पोलिसांच्या हाती लागली. या तरुणीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.
अविवाहित असताना बाळाला जन्म दिल्याचे घरच्यांना व नातेवाईकांना समजल्यास आपली व आपल्या कुटुंबाची बदनामी होईल, या भितीने पीडित तरुणीने हा प्रकार केल्याचे तपासात आढळून आले आहे. सदर तरुणी उलवे येथे एकटीच राहत होती का? की आणखी कोण तिच्यासोबत येथे राहत होते याचा पोलिस तपास करत आहेत.
आठ महिने या तरुणीने गर्भ वाढू दिला. यानंतर तिने स्वत: बाळाला जन्म दिला. मात्र, तिने बाळाला बाथरुमच्या खिडकीतून फेकून दिले. तिच्या या निर्दयी कृत्याच संताप व्यक्त केला जात आहे. प्रेमात धोका मिळाल्याने नैराश्यातून तिने बाळाची हत्या केल्याचा संशय देखील पोलिसांनी व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.