महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च दरम्यान तर दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यानचा गैर प्रकरांना आळा बसावा यासाठी परीक्षा केंद्रावर शिक्षण विभागातर्फे कठोर पावले उचली जाणार असल्याचे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
परीक्षेच्या काळात कॉफीसारखा गैरप्रकार टाळण्यासाठी बैठक पथक नेमण्यात येणार आहे, शाळा - महाविद्यालयात पेपरच्या संपूर्ण वेळेत बसेल या पथकात कमीत कमी चार सदस्यांचा समावेश असेल. तसेच दोन सदस्य प्रत्येक परीक्षा ब्लॉक मधून फेरी मारतील, तर दोन सदस्य केंद्राच्या आवारात लक्ष ठेवतील. परीक्षा केंद्रच्या बाहेर कॉफी पुरवणारा घोळका असेल तर त्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.
दरम्यान दहावी बारावीच्या परीक्षा पारदर्शक वातावरणात पार पडण्याची जबाबदारी जिल्हा दक्षता समितीची असेल , असे विभागीय शिक्षण मंडळाने म्हटले आहे.
वरील बातमी इंग्लिश मध्ये वाचा: क्लिक मी