ब्रम्हपुरी: तालुक्यातील लाडज ते चिखलगाव येथील वैनगंगा नदी फाट्यावर एक रपटा तयार करण्यात आलं होत. त्यामुळे गावातील व इतर ठिकाणच्या नागरिकांचं प्रवास सुखद होऊ लागलं. वैनगंगा नदीला महापूर आल्यामुळे हा रपटा / फाटा मार्ग उद्धवस्त झालं आहे. त्यामुळे जनतेला वैनगंगा नदी रपट्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रपट्याच्या बांधकामामुळे शाळेकरी मुलांचा शैक्षणिक नुकसान अतोनात होत आहे. तरी आता पूर कमी झाल्यामुळे रपट्याचे काम प्रशासनाने त्वरीत करुन द्यावे.
सद्या परिस्थितीत दुचाकी व ट्रॅक्टर वाहनाची मार्गे वाहतुक सुरु आहे. परंतु प्रवास करीत असताना अनेक दुचाकी वाहन चालक नदीच्या पाण्यात पडले आहेत.
लाडज गावात आरोग्य सुविधेचा अभाव असून गरोदर स्त्रिया आणि शाळकरी मुले सुद्धा येथूनच प्रवास करतात .
पूर कमी होऊन अंदाजे 6 महिने पूर्ण झाली. वैनगंगा नदीचा रपटा आजही जैसे - थे आहे. पूराचे पाणी कमी झाल्यामुळे मुळे नदीमधुन रपटा केल्यास वाहतुक सोईस्कर होणार आहे. वेळ व पैशाची बचत होणार आहे. दरम्यान पावसाच्या दिवसात गरोदर माता यांना खुपच त्रास झाला. पावसाळ्यात साथीचे रोग पसरले तेव्हापण या परिसरातील जनतेला खुपच त्रास झाला. तरी प्रशासनाने याची त्वरीत दखल घेवुन नदीवर रपटा करुन द्यावे. अशी परिसरातील जनतेकडुन मागणी होत आहे.